Script 1
(हे रेकॉर्डिंग IVR मध्ये वापरले जाईल.. आपण समोरच्यांना गुंतवून ठेवायला हवे.)
नमस्कार ! आमच्या कंपनीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद ! प्रत्येक भाषेत तुमच्या प्रोजेक्टसाठी व्हॉइस -ओव्हर मिळविण्यासाठी सर्वोत्तम पर्याय !
कंपनीबद्दल आणखी जाणून घेण्यासाठी , एक दाबा.
जर आपणांस प्रॉजेक्ट जमा करायचे असतील
किंवा आमच्या सेल्स टीम शी बोलायचे असेल , तर दोन दाबा.
आमच्या उपयुक्त मार्केटिंग टीमची मदत हवी आहे ?
नो प्रॉब्लेम ! तीन दाबा.
गुणवत्तेशी निगडीत माहितीसाठी , चार दाबा.
काही नवीन कल्पना आहेत ? सुचना? आम्हाला ते जाणून घ्यायला निश्चितच आवडेल. पाच दाबा.
( कृपया हे कुजबुजल्यासारखे वाचा ) पस्स्स ! टीम मध्ये सामील व्हायचे आहे ?
(मागील व्हॉइसवर परत) आम्ही कर्मचारी भरती करीत आहोत
सध्या उपलब्ध नोकरीच्या संधीसाठी कृपया आमच्या वेबसाईटला भेट द्या .
Script 2
(हे रेकॉर्डिंग मार्केटिंग मोहिमेतील व्हिडीओ मध्ये वापरले जाईल. आपल्याला हे काव्यमय, इंटरेस्टिंग आणि थोडे गूढ हवे. )
ह्या जगात जेव्हा व्हॉइस -ओव्हर मिळणे कठीण होते , ह्या जगात जेव्हा व्हॉइस -ओव्हर मध्ये करिअर करणे त्रासदायक आणि महागडे होते , तेव्हा आम्ही एका क्रांतीची सुरुवात केली.
प्रवास सोपा नव्हता , पण आज आम्ही सर्वात मजबूत आहोत.
टप्या टप्याने आम्ही डिजिटल सेवा तयार केली , व्हॉइस -ओव्हर इंडस्ट्री तुमच्या घरापर्यंत आणण्यासाठी ! आम्ही या मोहिमेत तुम्हालाही सामावून घेतले आहे आणि ह्या स्वप्नात तुमच्या सहभागाची आम्ही वाट पाहत आहोत.
इथून मागे वळून बघणे नाही. आम्ही आलो , आम्ही जग बदलले , आणि आम्ही इथे आहोत ( थोडे थांबून ) पाय रोवण्यासाठी !
आम्ही आणतोय , व्हॉइस -ओव्हर इंडस्ट्री- तुमच्या हातात !
Script 3
(हे रेकॉर्डिंग आमच्या प्रॉडक्ट व्हिडिओमध्ये वापरले जाईल. हे अत्यंत जोमदार , चित्तवेधक आणि ओघवते असायला हवे)
आम्ही प्रोफेशनल व्हॉइस -ओव्हर मिळविण्यासाठी सर्वोत्तम पर्याय का आहोत ?सर्वप्रथम , आम्ही फक्त उत्तम दर्जाचे व्हॉइस -ओव्हर पुरवितो जे की आमच्या गुणवत्ता प्रमाणित टीम कडून तपासले जातात. याशिवाय आमच्या व्हॉइस -ओव्हर कलाकारांच्या श्रेणीमध्येतुमच्यासाठी विविध भाषा , शैली आणि बजेटचे हजारो पर्याय आहेत ! आणि त्याही पेक्षा उत्तम म्हणजे , आम्ही आमच्या कामाची समाधान हमी देतो. जर अापण आमच्या कामा सम्बंधी समाधानी नसाल तर आमची गुणवत्ता प्रमाणित टीम आपल्याला आपले पैसे परत करेल. ( प्रत्येक शब्दानंतर लहान विराम द्या , थोडे थांबा . ) कोणत्याही प्रश्नांशिवाय !
आम्ही ग्राहकांच्या सेवेसाठी अतीदक्ष आहोत , आमची टीम आपणास मदत करावयास तत्पर आहे. आपला आमच्याबरोबरचा अनुभव सोपा, व्यावसायिक (थोडे थांबून ) आणि मजेशीरअसावा याची आम्ही खात्री देतो.